Sensex Opening Bell : बाजाराची सुरुवात लाल चिन्हात; जाणून घ्या मार्केटचा आजचा मूड | पुढारी

Sensex Opening Bell : बाजाराची सुरुवात लाल चिन्हात; जाणून घ्या मार्केटचा आजचा मूड

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sensex Opening Bell : भारतीय बाजाराची सुरुवात आज नकरात्मक लाल संकेतांमध्ये झाली. सुरुवातीला बाजार सपाट उघडला नंतर निफ्टी आणि सेन्सेक्स दोघांनी उतरता क्रम पकडला. निफ्टी थेट 19,500 च्या खाली आला तर सेन्सेक्स देखील 240 अंकांनी घसरला. बँक निफ्टी 44350 च्या खाली ट्रेड करत आहे. जाणून घ्या मार्केटमधील आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स

Sensex Opening Bell : या कंपन्याची चांगली कामगिरी

सकाळच्या सत्रात बाजार नकारात्मक संकेतात उघडल्यानंतरही एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल्स, ग्रासिम आणि टाटा मोटर्सचा सर्वाधिक फायद्यात राहिल्या आहेत. एससीएल टेक आणि टायटन सर्वाधिक चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

या कंपन्यांना तोटा

सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को आणि एसबीआय लाइफ यांचा तोटा झाला. तर सोन्याची किंमत देखील घसरली. मजबूत डॉलर निर्देशांक आणि रोखे उत्पन्न या दोघांच्या एकत्रित परिणामामुळे आज शुक्रवारी बाजारात सकाळच्या सत्रात सोन्याची किंमत घसरल्याचे दिसून आले.

 

हे ही वाचा :

Back to top button