Stock Market Closing Bell | बाजारात दोन सत्रांतील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स १०६ अंकांनी घसरून बंद | पुढारी

Stock Market Closing Bell | बाजारात दोन सत्रांतील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स १०६ अंकांनी घसरून बंद

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारातील सलग दोन सत्रांतील तेजीला आज मंगळवारी ब्रेक लागला. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांदरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी आज घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स १०६ अंकांनी घसरून ६५,८४६ वर बंद झाला. तर निफ्टी २६ अंकांच्या घसरणीसह १९,५७० वर स्थिरावला.

निफ्टी ५० वर हिरोमोटोकॉर्प, एसबीआय लाईफ, सिप्ला, टेक महिंद्रा आणि विप्रो हे शेअर्स वाढले. तर अदानी एंटरप्रायजेस, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, हिंदाल्को इंडस्ट्रिज, एम अँड एम हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. आज पीएसयू बँक आणि फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ वाढले.

आजच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो, मेटल आणि एफएमसीजी क्षेत्राला अधिक फटका बसला. या क्षेत्रातील स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. PSU बँक निर्देशांक सुमारे ३ टक्के वाढला. (Stock Market Closing Bell)

सेन्सेक्स आज ६६ हजारांवर खुला झाला होता. सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, विप्रो, एसबीआय, टायटन, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स वाढले. तर पॉवर ग्रिडचा शेअर सेन्सेक्सवर टॉप लूजर ठरला. हा शेअर २.५८ टक्के घसरून २४१ रुपयांवर आला. त्यासोबत एम अँड एमचा शेअर १ टक्क्यांहून अधिक घसरून १,५०१ रुपयांवर राहिला. जेएसडब्ल्यू, नेस्ले इंडिया, सन फार्मा, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, आयटीसी, भारती एअरटेल हे शेअर्सही घसरले. (Stock Market Closing Bell)

आशियाई बाजारात संमिश्र स्थिती

दरम्यान, आशियाई शेअर बाजारातही संमिश्र वातावरण राहिले. जपानचा निक्केई निर्देशांक ०.३८ टक्के वाढून ३२,३७७ वर बंद झाला. दरम्यान, हाँगकाँगचा हँगसेंग १.३ टक्क्यांनी घसरला. तर चीनचा शांघाय कंपोझिट सुरुवातीच्या व्यवहारात सपाट झाला होता.

परदेशी गुंतवणूकदारांनी एका दिवसात १,८९३ कोटींचे शेअर्स विकले

भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा कायम आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FIIs) सोमवारी सलग सातव्या सत्रात भारतीय शेअर्सची निव्वळ विक्रेते बनले. त्यांनी एका दिवसात १,८९३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. गेल्या सात सत्रांमध्ये FII नी ९,७४० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button