Nuh Violence : काँग्रेस आमदार मम्मन खान यांची सुरक्षा हटवली | पुढारी

Nuh Violence : काँग्रेस आमदार मम्मन खान यांची सुरक्षा हटवली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नूह हिंसाचारानंतर हरियाणा सरकारने झिरका मतदारसंघातील काँग्रेस आमदार मम्मन खान यांची सुरक्षा काढून घेतली आहे. नूह येथील हिंसाचाराशी मामन खान यांचे नाव जोडले जात होते. विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना मोनू मानेसर यांना मेवातमध्ये येण्याचे आव्हान देणारे आक्षेपार्ह विधान मम्मन खान यांनी केले होते. यानंतर अनेक संघटनांनी त्‍यांच्‍यावर नूह येथील हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आहे.

Nuh Violence : माझ्‍या जीवाला धोका : मम्मन खान

सरकारने माझी सुरक्षा हटविल्‍यामुळे माझ्‍या जीवाला धोका आहे, असा दावा मम्मन खान यांनी केला आहे. यासंदर्भात त्‍यांनी हरियाणा पोलीस महासंचालक, सीआयडी प्रमुख आणि गुरुग्राम पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यांना सतत धमक्या येत असल्याने त्यांची सुरक्षा बहाल करण्यात यावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

३१ जुलै रोजी नूह येथे भडकलेल्‍या हिंसाचारप्रकरणी मम्मन खान यांना प्रश्‍नांचा सामना करावा लागत आहे. मोनू मानेसर यांच्याबद्दल बोलताना मम्‍मन खान यांनी विधानसभेत म्हटले होते, ते मेवातमध्ये आले तर कांद्यासारखे कापले जातील. याशिवाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या हिंसाचाराला मम्‍मन खान जबाबदार असल्‍याचा आरोप होत आहे.

हेही वाचा :

Back to top button