Amrit Udyan : राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 16 ऑगस्टपासून जनतेसाठी खुले | पुढारी

Amrit Udyan : राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 16 ऑगस्टपासून जनतेसाठी खुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान जनतेला पाहण्यासाठी येत्या 16 ऑगस्टपासून खुले केले जाणार आहे. सुंदर बगीचे आणि फुलांसाठी प्रसिध्द असलेले हे उद्यान याआधी मुघल गार्डन या नावाने ओळखले जात होते.

उद्यान उत्सव – 2 अंतर्गत हे अमृत उद्यान एका महिन्यासाठी जनतेला पाहता येईल, अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून गुरुवारी देण्यात आली. 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सदर दिवशी अमृत उद्यानात केवळ शिक्षकांना प्रवेश दिला जाईल. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत अमृत गार्डन पाहता येईल. यासाठी राष्ट्रपती भवनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करावे लागेल. उद्यानात प्रवेशासाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Back to top button