वर्धा : आरटीओच्या तपासणीत ६८ स्कूल बस वाहने दोषी  | पुढारी

वर्धा : आरटीओच्या तपासणीत ६८ स्कूल बस वाहने दोषी 

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : आरटीओच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत ६८ स्कूल बस दोषी आढळल्यात. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनांवर एक लाख ९४ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये ५१५ स्कूल बस, स्कूल व्हॅन नोंदणीकृत आहेत. त्यातील १९७ स्कूल बस, स्कूल व्हॅनधारकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण न केल्याचे कार्यालयीन अभिलेखावरून निदर्शनास आले. त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या. मात्र त्यानंतरही अनेकांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण केले नाही. दरम्यान, एक ते २४ जुलै या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतने २०६ स्कूल बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६८ वाहने दोषी आढळलीत. त्यातील तेरा वाहने निकाली काढण्यात आली. यामध्ये एक लाख ९४ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला. विद्यार्थ्यांसाठीच्या स्कूल व्हॅन योग्य परिस्थितीत आहेत काय, त्यांच्याकडे योग्य प्रमाणपत्रे, कागदपत्रे आहेत काय, याबाबत सर्वांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Back to top button