China BYD : भारताने चिनी कंपनीचा १ अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळला | पुढारी

China BYD : भारताने चिनी कंपनीचा १ अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील दिग्गज इलेक्ट्रीक कार कंपनी बीवायडीचे (China BYD)  भारतात १ अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प धुडकावून लावला आहे. त्यामुळे भारतातील इलेक्ट्रीक कारच्या बाजारपेठेत उतरण्याचे चीनचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, China BYD  हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) या कंपनीसोबत इलेक्ट्रीक कार तयार करण्यासाठी एक प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे, त्यासाठी कंपनीने उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन (DPIIT) विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.

याबाबत डीपीआयआयटीने विविध विभागांकडून माहिती मागवली होती. त्यानंतर सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे देशातील सध्याचे नियम अशा गुंतवणुकीला परवानगी देत ​​नाहीत,असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोरोना काळानंतर अनेक चायना कंपन्यांना भारताने बाहेरचा रस्ता दाखविला आहे. परंतु, पुन्हा एकदा चीनमधील कार उत्पादक कंपनी बीवायडीने भारतात पाय रोवण्याची योजना आखली होती. परंतु त्यांना यश आले नाही.

China BYD : हैदराबादमध्ये उभारणार होते प्रकल्प

बीवायडी कंपनी हैदराबादमधील मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारीमध्ये हा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत होती. त्यासाठी कंपनीने भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी केली होती. परंतु, भारत सरकारने बीवायडीचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे चीनचे स्वप्न भंग पावले. भारत सरकारने प्रस्ताव फेटाळल्याने बीवायडीला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा 

Back to top button