राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपच्या आमदारांना देखील निधी दिला – देवेंद्र फडणवीस | पुढारी

राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपच्या आमदारांना देखील निधी दिला - देवेंद्र फडणवीस

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केवळ राष्ट्रवादीच्याच आमदारांना नाही तर भाजप- सेनेचे आमदार आणि इतरही आमदार सगळ्यांना निधी दिलेला आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीलाच झुकते माप दिले असे म्हणणे योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पूरस्थितीवर लक्ष, शासन, प्रशासन अलर्ट मोडवर दरम्यान,विदर्भासह राज्यात विविध भागांमध्ये सध्या सातत्याने अतिवृष्टीमुळे सुरू आहे. काही ठिकाणी पंधरा दिवसात पडणारा पाऊस तेवढा दोन-तीन दिवसात पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाकडून मिळणाऱ्या सुचनानंतर सगळीकडे अलर्ट दिलेला आहे. वेदर अलर्ट सुद्धा दिले जात आहेत.

अतिवृष्टी संदर्भात पुरेशी काळजी सुद्धा प्रशासन घेत आहे. एनडीआरएफ सज्ज असून ठिकठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चाललेले आहे. मात्र,अनेक वेळा आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पहायला मिळतो. NDRF च्या प्रोटोकॉल नुसार काही नियम आहेत. त्यानुसार त्या ठिकाणी गावकरी असतील सरपंच असतील परिवारातले लोक असतील या सगळ्यांना एकत्रित करून विश्वासात घेऊन कुठल्यातरी क्षणी हे कार्य सुरू होते आणि थांबते याकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

हेही वाचलंत का?

Back to top button