छत्रपती संभाजीनगर : डोनगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : डोनगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डोणगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारुन सहा आरोपी विरुद्ध कारवाई करुन २ लाख ७५ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.  याबाबत अधिकची माहिती अशी की, पैठण तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डोणगाव येथे पैशावर मोठ्या प्रमाणावर जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या पथकाला मिळाली होती. यानंतर सोमवारी (दि.१७) विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम शिरसाट, जमादार गोपाल पाटील, भागिनाथ आहेर, श्रीकांत दांडगे यांनी जुगार चालू असलेल्या डोणगाव येथे सापळा रचून जुगार अड्ड्यावर छापा मारला.

यावेळी पवन कल्याण जाधव (रा. डोणगाव, तांडा) अशोक हरिचंद्र नवपुते (रा. विहामांडवा), गणेश फकीराव गायकवाड (रा. ठाकूरवाडी ता.अंबड जिल्हा -जालना) नामदेव वामनराव शरणागत (रा. पिंपरखेड), दत्तात्रय प्रभू चव्हाण (रा. डोणगाव,बाप्पासाहेब दगडू बोर्डे रा. कासार पाडळी) हे पैशावर जुगार खेळताना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून सहा दुचाकी, पाच मोबाईल आणि नगदी रक्कम ८ हजार ३८० रुपये असे एकूण २ लाख ७२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.  ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून सदरील आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस अमलदार श्रीकांत दांडगे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button