गडकरी धमकी प्रकरणातील मुख्य सुत्रधार अफसर पाशाच्या चौकशीसाठी NIA चमू नागपूरात | पुढारी

गडकरी धमकी प्रकरणातील मुख्य सुत्रधार अफसर पाशाच्या चौकशीसाठी NIA चमू नागपूरात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील मुख्य सुत्रधार अफसर पाशाला काल नागपूर पोलिसांच्या विशेष पथकाने नागपुरात आणले. 19 जुलै पर्यंत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. आता या कुख्यात पाशाच्या चौकशीसाठी NIA चमू नागपूरात आली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी अफसर पाशाबाबत आज नागपूर पोलिसांकडून माहिती घेतली.

यापूर्वी धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीसाठी दिल्लीवरून एनआयए चमू आली होती. दरम्यान, नागपूर पोलीसांकडून लष्कर ए तोयबाशी थेट संबंध असलेल्या अफसर पशाच्या तपासाचे हे प्रकरण एनआयएकडे देण्यासाठी उद्या न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रानी दिली. गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी अफसर पाशा, जयेश पुजारी या दोघांचा आता एनआयए पुन्हा एकदा तपास करणार आहे. अफसर पाशाच्या सांगण्यावरुनच बेळगावच्या कारागृहातून जयेश पुजारी याने नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन करुन 4 जानेवारीला १०० कोटींची आणि नंतर 21 मार्च रोजी 10 कोटींची मागणी केली होती.

Back to top button