चंद्रपूर : पट्टेदार वाघाची दहशत; दहा दिवस मुक्ताबाई धबधबा पर्यटकांसाठी बंद | पुढारी

चंद्रपूर : पट्टेदार वाघाची दहशत; दहा दिवस मुक्ताबाई धबधबा पर्यटकांसाठी बंद

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील मुक्ताबाई धबधब्याजवळील शेतशिवारातून एका साठ वर्षीय शेतकऱ्याला वाघाने उचलून नेत ठार केल्याची घटना घडली. यानंतर वनविभागाने हा धबधबा पर्यटकांसाठी दहा दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. याच परिसरात आठ कॅमेरे लावून पट्टेदार वाघावर वनविभागाने करडी नजर ठेवली आहे. तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे मुक्ताबाई धबधबा कोसळू लागल्यानंतर बंद करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

चिमूर तालुक्यातील डोमा गावाजवळ जंगलात मुक्ताबाई धबधबा आहे. पावसानंतर हा धबधबा भरभरून कासळतो. त्यामुळे हजारो पर्यटकांची गर्दी मुक्ताबाई धबधब्यावर होते. तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस दमदार कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, लघू व मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याचा साठ्यात वाढ झाली आहे. चिमूर तालुक्यातील डोमा गावाजवळील मुक्ताबाई धबधबाही भरभरून कोसळत आहे. दरवर्षी पावसात या धबधब्यावर हजारोंच्या संख्येने पर्यटकांची तुफान गर्दी असते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसात पर्यटक मुक्ताबाई धबधब्याकडे वळत आहेत. परंतु याच धबधब्याजवळील तिनशे मिटर अंतरवरील शेतशिवारात शुक्रवारी 60 वर्षीय डोमळू सोनावने हा शेतात पिकांची पहाणी व जनावरे चारत असताना त्याला याच परिसरातील जंगलातून येत एका पट्टदेार वाघाने उचलून नेले. यामध्ये त्या शेतकऱ्याचा मृतदेह जंगलालगत दुसऱ्या दिवशी मिळाला.

घटनास्थळ आणि मुक्ताबाई धबधबा लागूनच असल्याने आणि या परिसरात वाघाचा अजूनही वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून वनविभागाने हा धबधबा दहा दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून या धबधब्यावर जाणाऱ्या रस्त्यावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. तिन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने आणि दुपारच्या पावसाने उसंत घेतल्याने पर्यटकांनी मुक्ताबाई धबधब्याकउे पर्यटनाच्या उदेश्याने धाव घेतली. परंतु पोलिसांनी ठिकठिकाणी पर्यटकांना धबबधाब बंद असल्याने रोखले. त्यामुळे पर्यटकांची हिरमोड झाली. सर्व ठिकाणी चेाख बंदोबस्त ठेवल्याने पर्यटकांना या ठिकाणी कुठूनही जाता आले नाही. मुक्ताबाई धबधबा हा दहा दिवसासाठी बंद करून वनविभागाने या परिसरात वावर करणाऱ्या पट्टेदार वाघावर करडी नजर ठेवली आहे.

चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी के. बी. देऊळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात वावर करणारा वाघ हा नर जातीचा आहे. त्याचा याच परिसरात वावर आहे. त्याच्यावर चिमूर वनविभागाची टीम नजर ठेवून, गस्त घालीत आहे. याच परिसरात ठिकठिकाणी आठ कॅमेरे लावण्यात आले आहे. त्याच्यावर नजर ठेवून पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पर्यटकांना 10 दिवस मुक्ताबाई धबधब्यावरील निसर्गरम्या वातावरणाचा लाभ घेण्यापासून मुकावे लागणार आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button