इस्रायलमधील जनता पुन्‍हा ‘रस्‍त्‍या’वर!, नेतन्‍याहू सरकारच्‍या ‘न्‍यायालयीन फेरबदला’स तीव्र विरोध | पुढारी

इस्रायलमधील जनता पुन्‍हा 'रस्‍त्‍या'वर!, नेतन्‍याहू सरकारच्‍या 'न्‍यायालयीन फेरबदला'स तीव्र विरोध

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारने इस्रायलमधील न्यायपालिकेत सुधारणा करण्याची योजना पुढे रेटली आहे. याविरोधात देशातील तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये हजारो आंदोलक ररस्‍त्‍यावरु उतरले असल्‍याचे वृत्त ‘अल जझीरा’ने दिले आहे.

न्‍यायपालिकेत सुधारणा करण्‍याची नेतन्‍याहू सरकारची योजना आहे. या विधेयकातील तरतूदी न्‍यायालयांना कार्यकारी आदेश रद्द करण्यास परवानगी देते. तसेच या विधेयकातील दुरुस्‍तीमुळे सरकारला न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्येही मोठा अधिकार मिळणार आहे. संबंधित विधेयक या महिन्याच्या अखेरीस मंजूर होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. .

तेल अवीवमध्‍ये शनिवारी या विधेयकाविरोधातील निदर्शनात देशभरातील आंदोलक सहभागी झाले. आंदोलकांनी सरकारविरोधात मोठा बॅनर फडकावला. हवेत रंग भिरकावले.जेरुसलेममधील पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराबाहेर निदर्शकांनी मशाली पेटवत सरकारचा निषेध केला. तसेच हर्झलिया आणि नेतन्या या शहरांमध्येही निदर्शने केली. देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रुग्णालयात असताना अशा वेळी निदर्शने झाली आहे. नेतन्‍याहू यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्‍याने त्‍यांना शनिवार १५ जुलै रोजी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button