Katrina Kaif : हॅपी बर्थडे कॅटरिना ! | पुढारी

Katrina Kaif : हॅपी बर्थडे कॅटरिना !

पुढारी ऑनलाईन : डान्सिंग क्वीन कॅटरिना कैफ ( Katrina Kaif ) आज (रविवारी) ४० वर्षात पदार्पण करत असून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ती पती विकी कौशलसमवेत सेलिब्रेशनसाठी मुंबई विमानतळावरून रवाना झाली. विकी व कॅटरिना हातात- हात गुंफून विमानतळावर आले, त्यावेळी त्यांची छबी टिपण्यासाठी गर्दीतून कॅमेरे पुढे सरसावले नसते तरच नवल! या जोडीने फोटोसाठी पोझही दिली. एका पापाराझीने इन्स्टाग्रामवर या जोडगोळीचा व्हिडीओ पोस्ट केला आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला.

बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅटरिनाने ( Katrina Kaif ) ‘तीस मार खान’, ‘अग्निपथ’, ‘धूम-३’, ‘बँग बँग’, ‘बार बार देखो’, ‘जब तक है जान’, ‘एक था टायगर’, ‘सिंग इज किंग’, ‘मैंने प्यार क्यूं किया’ या चित्रपटांतील काही हिट गाण्यांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आपल्या रोलशी तिची केमिस्ट्री जुळते, हेच या चित्रपटांमधून दिसून आले आहे. सलमान शिखरावर असताना कॅटरिनानेही आपल्या अद्वितीय डान्सिंग मूव्हजनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात कसर सोडलेली नाही.

ही ‘बर्थडे गर्ल’ आता पुढील दिवाळी सलमान खानबरोबरच ‘टायगर-३’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट बंदा दिवाळीत प्रदर्शित होईल, असे यापूर्वी जाहीर केले गेले. कॅटरिना याशिवाय श्रीराम राघवन यांच्या ‘मेरी ख्रिसमस चित्रपटात विजय सेतुपतीच्या साथीने झळकेल. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट व प्रियांका चोप्राच्या साथीने कॅटचीही भूमिका असणार आहे.

हेही वाचा : 

( video : viralbhayani instagram वरून साभार )

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button