Katrina Kaif : त्यानंतर कॅटरिना- रणबीरचे ब्रेकअप | पुढारी

Katrina Kaif : त्यानंतर कॅटरिना- रणबीरचे ब्रेकअप

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif ) हिने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधून आनंदी आयुष्य जगत आहे. तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूरनेही अभिनेत्री आलिया भट्ट हिला जीवनसाथी केले आहे. मात्र, कधीकाळी कॅटरिना आणि रणबीर रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी काही सिनेमांमध्ये एकत्र कामही केले आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांच्या नाताचा शेवट झाला.

दरम्यान, बॉलीवूडचा ‘सीरियल किसर’ म्हणून ओळख असलेल्या इम्रान हाश्मीने कॅटरिनाला (Katrina Kaif ) एक सल्ला दिला होता. यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. दिग्दर्शक करण जोहर याचा ‘शो कॉफी विथ करण’ मध्ये इम्रानने रॅपिड फायरमध्ये रणबीर आणि कॅटरिना यांच्या नात्याबाबत भाष्य केले. इम्रान म्हणाला, ‘आता लेडीज मॅनवाला खेळ बंद कर. चाहत्यांची तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत’. तर पुढे इम्रानने कॅटरिनाला रणबीरला सोडण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबतचा ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात कॅटरिनाची एन्ट्री झाली. दोघांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. मात्र, ‘जग्गा जासूस’ सिनेमानंतर रणबीर आणि कॅटरिना यांचे ब्रेकअप झाले.

हेही वाचा : 

Back to top button