शंभर कोटींचा उद्योग उभारून मुंढेंचा तरुणांपुढे आदर्श : आमदार प्रवीण दरेकर | पुढारी

शंभर कोटींचा उद्योग उभारून मुंढेंचा तरुणांपुढे आदर्श : आमदार प्रवीण दरेकर

बोधेगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील हातगाव भागात एस एम कॉटन जिनिंग अ‍ॅण्ड स्पिनिंगसारखा 100 कोटी रुपयाचा उद्योग उभा करून केशव मुंढे यांनी तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे, असे गौरोदगार आमदार प्रवीण दरेकर यांनी काढले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव-हातगाव मार्गावर एस.एम. कॉटन जिनिंग अ‍ॅण्ड स्पिनिंग या मिलचे उद्घाटन आमदार दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पिनिंगचे अध्यक्ष केशव मुंढे, आमदार मोनिका राजळे, रामगिरी महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक पुरुषोत्तम दळवी, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी कार्यकारी संचालक रामसुख मंत्री, बालमटाकळीचे उपसरपंच तुषार वैद्य, सावता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मयूर वैद्य, डॉ. नीलेश मंत्री आदी उपस्थित होते.

आमदार दरेकर म्हणाले, तरुणांच्या हाताला काम मिळावे, शेतकर्‍यांना दोन पैसे जास्त मिळून त्यांच्या कुटूंबाला हातभार लावावा, या प्रामाणिक हेतूने या संस्थेचे अध्यक्ष केशव मुंढे यांनी हा प्रकल्प उभारला. त्यामुळे मी अधक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 60 कोटी रुपये कर्ज दिले. दोन वर्षांत हा उद्योग उभा राहीला. जे गरिबांसाठी, शेतकर्‍यांसाठी काम करतात आणि ज्यांना कोणी मदत करत नाही, त्यांना आम्ही मदत करतो. आमदार बच्चूभाऊ कडू यांनी अचलपूरमध्ये संत्र्यावर प्रक्रिया उद्योग उभारला. त्याला आंम्ही 14 कोटी रुपये कर्ज दिले.

यावेळी बोधेगावचे उपसरपंच नितीन काकडे, कासम शेख, समाधान मुंढे, रामनारायण मंत्री, प्रा. भाऊसाहेब मुरकुटे, प्रभाकर हुंडेकरी, सुहास फुंदे, पिंगेवाडीचे सरपंच अशोक तानवडे, सुनील मुंढे, अनिरुद्ध मुंढे, ठेकेदार उदय मुंढे, भागवत मुंढे, अंकुश मुंढे, सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल घोरतळे, विठ्ठलराव अभंग, चरणसिंग परदेशी, किरण पाथरकर आदी उपस्थित होते. यावेळीअरुण मुंढे, सिद्धार्थ कांबळे, रामसुख मंत्री, तुषार वैद्य यांची भाषणे झाली. संजय केदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नीलेश मंत्री यांनी आभार मानले.

मुंढेंनी टेक्सटाईल पार्क उभारावे : आमदार राजळे
आमदार राजळे म्हणाल्या, केशव मुंढे यांनी या परिसरात टेक्सटाईल पार्क उभारावा. त्याला आमच्या बँकेकडून अर्थपुरवठा करूच; पण सरकारकडून सर्वतोपरी मदत करू. मुंढे यांची मूर्ती लहान, पण कीर्ती महान आहे. त्यांच्या माध्यमातून 500 ते 600 तरुणांना रोजगार मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल.

 

Back to top button