मनमोहक दृश्य: तळेगाव परिसरात ढग घेत आहेत डोंगरांची भेट | पुढारी

मनमोहक दृश्य: तळेगाव परिसरात ढग घेत आहेत डोंगरांची भेट

तळेगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: तळेगाव दाभाडे परिसरात पावसाळी वातावरण असुन सतत पाऊस पडत आहे. परिसरात निसर्ग बहरला आहे. धबढबे डोंगरावरुन वेगात खाली वाहत आहेत. धबधब्याखाली भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा या भागात वाढला आहे. श्री घोरावाडीश्वर डोंगर, श्री चौराईमाता डोंगर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर, श्री हरणेश्वर टेकडी आदी ठिकाणी देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणच्या लोकांचा ओढा वाढला आहे.

तसेच कुंडमळा, उर्से येथेही पर्यटकांची गर्दी दिसुन येत आहे. ढग डोंगरांना स्पर्श करीत असुन जणू काय डोंगरांना भेटत आहेत असे दृश्य तयार होत आहे. हे दृश्य विलोभनीय आणि नजर खिळवून ठेवणारे नेत्रदिपक आहे. आकाशात पावसाळी ढग, हिरवागार निसर्ग, डोंगरावर, माळरानावर, पठारावर चरणारी जनावरे, पडणारा पाऊस हवेत अल्हाददायक गारवा असे मनोहर दृश्य परिसरात अनेक ठिकाणी दिसत आहे. लोणावळा, खंडाळा, कार्ला,भांजे, मळवली पवनानगर ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहेत. परंतु, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तळेगाव दाभाडे परिसरात पर्यटक येत आहेत. यामुळे मकाची कणसे, भुईमूग शेंगा, भजी, वडापाव, भेळ आदी खाण्याच्या पदार्थांचा व्यावसाय करणाऱ्यांना सुगीचे दिवस आलेले आहेत.

हेही वाचा:

Haryana Jind Accident : हरियाणातील जिंद येथे बस-क्रुझरच्या धडकेत 8 ठार, 12 जखमी

पुणे : शिरूरमध्ये घूमजाव होणार !

८० च्या पुढे गेला की गुरु मानण्याचा नवा क्रायटेरिया : प्रख्यात दिग्दर्शक डॉ . जब्बार पटेल 

 

Back to top button