देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून महाजन सुरक्षित, नाहीतर... : एकनाथ खडसे
जळगाव : नाशिक आणि पुण्यातील गुटखाकिंगवर कारवाई करण्यात आली आहे. महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळे केलेले आहे. त्यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. पुणे आणि नाशिकमध्ये कारवाई झालेले गुटखाकिंग त्यांच्या जवळचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
खडसे आणि महाजन यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. आता खडसे यांनी पुन्हा ना. महाजन यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आमदार खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. स्वत: महाजनांवर मोक्का लागलेला आहे. ते जामिनावर सुटलेले आहेत. महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळे केलेले आहे. उपमुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप आमदार खडसे यांनी केला आहे.
शासनाच्या आशीर्वादामुळे गुटखाविक्री
पुण्यात गुटखाकिंग तुषार जगतापवर कारवाई करण्यात आली. तो राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचा आहे. महाजनांच्या आशीर्वादानेच तो गुटख्याचे उद्योग करायचा. याआधीही ठाकूर नावाच्या गुंडावर नाशिकमध्ये मोक्का लावण्यात आला होता. तोही महाजन यांच्या अत्यंत जवळचा होता. तो महाजन यांच्या गाडीतून फिरायचा. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत सहभागी व्हायचा. केवळ हे दोन लोकच नव्हे, तर अशा प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे अनेक लोक गिरीश महाजनांच्या आजूबाजूला दिसून येतात. गुटखाकिंग यांचा कार्यकर्ता, ज्याच्यावर मोक्का लागला, तोही भाजपचा कार्यकर्ता त्यामुळे शासनाच्या आशीर्वादामुळे राज्यात गुटखाविक्री सुरू असल्याचा आरोप आमदार खडसे यांनी केला आहे.
हेही वाचा :