कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष दिवेकर यांचा राजीनामा | पुढारी

कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष दिवेकर यांचा राजीनामा

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष राहुल दिवेकर (दौंड) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाच्या मंगळवारी (दि.27) झालेल्या बैठकीपूर्वी त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार अध्यक्ष बदलानंतर आता जिल्हा दूध संघात उपाध्यक्षपद कोणत्या तालुक्याकडे जाणार, याकडे दूध उत्पादक संस्था आणि शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

या गारटकर यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अन्य संचालकांना उपाध्यक्षपदी संधी देण्यासाठी पक्षाच्या निर्णयानुसार दिवेकर यांना राजीनामा देण्याची सूचना केली आहे. तर पक्षाच्या सूचनेनुसार व वैयक्तिक कारणामुळे मी जिल्हा दूध संघात राजीनामा दिल्याची माहिती उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांनी दिली. त्यामुळे उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अपेक्षित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Back to top button