Nashik : सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू | पुढारी

Nashik : सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेकडून सवलत योजना राबविली जात असून, या योजनेचा चालू महिना अखेरचा असल्याने अधिकाधिक नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा म्हणून रविवारी (दि. २५) सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवले आहेत. सवलत योजने अंतर्गत मालमत्ता करदात्यांना जून महिन्यात करावर तीन टक्के सूट तसेच ई-पेमेंटद्वारे (Online) भरणा केल्यास सर्वसाधारण करात पाच टक्के सवलत (जास्तीत जास्त तीन हजारांपर्यंत) लागू होणार आहे. दरम्यान, महापालिकेने शनिवारी (दि. २४) सुटीच्या दिवशी कर भरणा केंद्र सुरू ठेवल्यानंतर रविवारी (दि. २५) देखील केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या सर्व विभागीय कार्यालये, उपकार्यालयांतील सर्व भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक करदात्यांनी सवलत योजनेचा लाभ घेऊन, महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button