Ram Charan-Upasana | चिरंजीवी झाले आजोबा, राम चरण-उपासना यांना कन्यारत्‍न | पुढारी

Ram Charan-Upasana | चिरंजीवी झाले आजोबा, राम चरण-उपासना यांना कन्यारत्‍न

पुढारी ऑनालाईन : दाक्षिणात्‍य सुपरस्‍टार राम चरण (Ram Charan) च्या घरी पाळणा हलला आहे. त्‍याची पत्‍नी उपासना केनिडेला हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आज सकाळी या जोडप्याने ही आनंदाची वार्ता आपल्‍या चाहत्‍यांना दिली. अनेक बॉलिवूड कलाकार त्‍यांना शुभेच्छा देत आहेत. काही महिन्यांपूर्वीच रामचरण आणि त्‍याची पत्‍नीने त्‍यांच्या त्‍यांच्या चाहत्‍यांना ही आनंदाची बातमी सांगितली होती. यानंतर त्‍यांच्या अपत्‍याबाबतच्या बातम्‍या चर्चेत येत होत्‍या. आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून, राम चरण आणि उपासना यांच्यावर त्‍यांच्या चाहत्‍यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Ram Charan-Upasana)

लग्‍नानंतर ११ वर्षांनी वडील बनले रामचरण

राम चरण आणि उपासना हे लग्‍नाच्या ११ वर्षानंतर आई-वडील बनले. आज २० जून रोजी त्‍यांनी चाहत्‍यांना सकाळी ही गोड बातमी दिली. याआधी राम चरण आणि त्‍याच्या पत्‍नीचा एक व्हिडिओ ऑनलाईनवर समोर आला होता. यानंतर काही वेळातच उपासना यांनी मुलीला जन्म दिला. या विषयी रूग्‍णालयाकडून सांगण्यात आले. मिसेस उपासना कामिनेनी कोनिडेला यांनी आज २० जून २०२३ रोजी हैदराबाद येथील अपोलो हॉस्‍पीटल जुबली हिल्‍स मध्ये एका मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ या दोघांचीही प्रकृती उत्‍तम आहे.

आरआरआर चित्रपट अभिनेता राम चरण याच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. उपासना यांनी २० जून रोजी सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला. काल १९ जून च्या रात्री उपासना यांना रूग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्‍यांच्यासोबत पती राम चरण आणि जवळचे लोक उपस्‍थित होते. आज मंगळवार सकाळी मुलीला जन्म दिला. ज्‍यानंतर साऱ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. राम चरण सोबतच त्‍याच्या चाहत्‍यांमध्येही या बातमीने आनंदाचे वातावरण आहे.

राम चरण-उपासना यांनी नुकताच लग्‍नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला

राम चरण-उपासना यांनी १४ जून रोजी आपल्‍या लग्‍नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला. या वेळेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ज्‍यात दाक्षिणात्‍य मेगा स्‍टार चिरंजीवी आपला मुलगा आणि सुनेवर आनंदाचा वर्षाव करताना दिसले होते. ज्‍यावेळी त्‍यांनी प्रेग्‍नंसीची घोषणा केली, तेव्हापासून त्‍यांचे चाहते या बातमीची वाट पाहत होते. चिरंजीवी देखील आजोबा बनल्‍याने खूप आनंदात आहेत. ते खूप काळापासून या दिवसाची वाट पाहत होते.

Back to top button