40 आमदारांची ताकद लक्षात ठेवा : गजानन कीर्तिकर | पुढारी

40 आमदारांची ताकद लक्षात ठेवा : गजानन कीर्तिकर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  चाळीस आमदार एकत्र आले आणि महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. हे सर्व आमदार एकत्र आल्यामुळेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आले. त्यामुळे चाळीस आमदारांनी आपली ताकद ओळखणे गरजेचे आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदेंच्या आमदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत भाजपच्या दबावतंत्राला झुगारण्याचा सूचक इशारा दिला.

शिवसेना वर्धापन दिनाच्या तयारीसाठी वरळी येथील एनएससीआय संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीच कीर्तिकर यांनी भाजपचा दबाव झुगारण्याचा सूचक इशारा आमदारांना दिला. भाजपच्या वाढत्या दबावतंत्रावर बोलताना कीर्तिकर म्हणाले की, 40 आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आली. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र आणि ताकदीने राहिले पाहिजे, असे किर्तीकर म्हणाले.

Back to top button