Kolhapur violence : वरणगे पाडळीत प्रार्थनास्थळाची तोडफोड, जाळपोळ; तणाव | पुढारी

Kolhapur violence : वरणगे पाडळीत प्रार्थनास्थळाची तोडफोड, जाळपोळ; तणाव

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या (Aurangzeb Status) समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याचा प्रकार बुधवारी समोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने गावातील डवाळे गल्लीतील प्रार्थनास्थळाची तोडफोड व जाळपोळ केली. (Kolhapur violence)

वरणगे पाडळीतील एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवर औरंगजेबाचा स्टेटस (aurangzeb whatsapp status) ठेवल्याचे हिंदुत्ववादी संघटनांच्या निदर्शनास आले. सुमारे सातशे ते आठशेच्या जमावाने संबंधित तरुणाच्या घरावर चाल करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणासह त्याचे आई, वडील रात्री गावातून पसार झाले होेते. त्यानंतर जमावाने प्रार्थनास्थळावर धडक देत तोडफोड व जाळपोळ केली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांचे पथक रात्री उशिरा गावात दाखल झाले.

परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button