अहमदनगर : अकोले येथे वीज पडून मजुराचा मृत्यू | पुढारी

अहमदनगर : अकोले येथे वीज पडून मजुराचा मृत्यू

अकोले पुढारी वृत्तसेवा : अकोलेसह घाटघर, भंडारदरा,राजूर परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाट व जोरदार वारा, वादळासह अवकाळी पाऊस पडला. म्हाळादेवी येथे अंगावर वीज पडून रामदास उर्फ यमा लक्ष्मण उघडे (वय ५६) या आदिवासी मजुरासह शेळी मृत्यूमुखी पडली आहे.

रविवारी दुपारनंतर अकोले तालुक्यातील घाटघर,उडदावणे,पाजरे,भंडारदरा, रंधाफाँल,राजूर, अकोले,म्हाळादेवी परिसरात विजेच्या कडकडाट व जोरदार वारा, वादळासह अवकाळी पाऊस पडला.तर रामदास उघडे हे डोंगराच्या कडेला रविवारी दुपारच्या सुमारास शेळ्या चारत होते,मात्र म्हळादेवी कारखांड परिसरात शेळ्या चारत उभे असलेल्या रामदास उघडे यांच्या अंगावर वीज कोसळली,अंगावर वीज कोसळल्यामुळे ते जागीच मयत झाले.

याशिवाय त्यांच्या शेजारी उभी असलेली एक शेळी ही जागीच गतप्राण झाली. स्थानिक नागरिकांनी रामदास उघडे यांना अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेनंतर अकोले ग्रामीण रुग्णालयात पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी म्हाळादेवी ग्रामपंचायतचे माजी सरपंच अगस्तीचे संचालक प्रदिप हासे, शिवसेनेचे नेते महेश नवले यांनी मयताच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे. मयत रामदास उघडे यांच्या पश्चात पत्नी,आई वडील,दोन मुले,एक मुलगी,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button