Bihar Bridge Collapsed : १७०० कोटी पाण्यात! बिहारमध्ये बांधकाम अंतिम टप्प्यात आलेला पूल कोसळला | पुढारी

Bihar Bridge Collapsed : १७०० कोटी पाण्यात! बिहारमध्ये बांधकाम अंतिम टप्प्यात आलेला पूल कोसळला

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बिहारमधील भागलपूर येथे आज (दि. ४ जून) बांधकाम अंतिम टप्प्यात आलेला पूल कोसळला. या घटनेचे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या निकृष्ठ बांधकामामुळे तब्बल १७०० कोटी रुपयांचा चुराडा झाला असल्याचे वृत्त ‘एएनआयने’ दिले आहे. (Bihar Bridge Collapsed)

बिहारच्या खगरियामध्ये अगुवानी सुलतानगंज गंगा पूल 1,700 कोटी रुपये खर्चून बांधला जात होता. याचे काम अंतिम टप्प्यात आले होेते. ‘एएनआयने’ दिलेल्या माहितीनुसार, पुलाचा बहुंताश भाग गंगा नदीत कोसळला आहे. एप्रिलमध्ये वादळामुळे या पुलाचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. (Bihar Bridge Collapsed)

खगरिया आणि भागलपूर जिल्ह्याला जोडण्यासाठी हा पूल गंगा नदीवर बांधण्यात येत होता. यासाठी एकूण खर्च १७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता बांधकाम अंतिम टप्प्यात असताना हा पूल कोसळल्याने बिहारमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.

हेही वाचा

Back to top button