कुरुंदवाड: वडिलांच्या आजारपणाच्या दु:खातही सौंदर्याची यशाला गवसणी | SSC Result | पुढारी

कुरुंदवाड: वडिलांच्या आजारपणाच्या दु:खातही सौंदर्याची यशाला गवसणी | SSC Result

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा: ऐन परीक्षेच्या काळातच वडिलांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर सांगली येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये त्यांचे निधन झाले. अशा परिस्थितीत जिद्द आणि कर्तुत्वाने मात करीत जीवनात प्रकाशमान कामगिरी करण्याची किमया येथील सौंदर्या सतीश पंढरपूरे हिने करून दाखवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत तिने 90.60 टक्के गुण (SSC Result) मिळवले आहे.

सौंदर्या येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकत आहे. अभ्यासाचे सातत्य, हॉलीबॉल खेळामध्ये व राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये तिने अनेक वेळा चांगली कामगिरी केली आहे. सौंदर्या पंढरपूरे (SSC Result) हिचे वडील सतीश पंढरपूरे यांच्या मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर 14 मार्चरोजी सांगली येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. ऐन परीक्षेच्या काळामध्ये सौंदर्याने परिस्थितीशी दोन हात करीत परीक्षेचे पेपर दिले. अशा वेळी तिला घरचे व नातेवाईकांनी आधार दिला होता. 11 मेरोजी वडील सतीश पंढरपूरे यांचे निधन झाले. आणि सौंदर्या व तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

२ जूनरोजी इयत्ता दहावीचा निकाल एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. यावेळी सौंदर्याला 90.60 टक्के गुण मिळाले. कठीण परिस्थितीतही अभ्यास करून सौंदर्याने चांगले गुण मिळवले, मात्र हे गुण बघायला वडील पाहिजे होते. अशी खंत सौंदर्याने व्यक्त केली.
ऐन परीक्षेच्या वेळी वडिलांच्या मेंदूत रक्तस्त्राव आणि त्यांचे निधन अशा परिस्थितीतही मनाचा ताबा ढळू न देता दहावीची परीक्षा दिली आणि 90.60 टक्के गुण मिळवले. हे पाहायला वडील नाहीत ही खंत व्यक्त करत.निकाल पाहिल्यानंतर सौंदर्या कॅफेमध्येच ओक्सा-बोक्सी रडू लागली अन् अनेकांना गहिवरून आले.

सौंदर्य पंढरपूर हिला शाळेतील सदाशिव तिगणे, सतीश माने, वर्षा गोखले, सुनिता कुलकर्णी, बाबासाहेब भुजूगडे, राहुल जंगम, विजय शहापुरे, सहदेव केंगाळे, शोभा बोंगाळे यांचे मार्गदर्शन तर पर्यवेक्षक श्रीकांत निकाळजे, मुख्याध्यापिका विनया जाधव यांचे प्रोत्साहन मिळाले.

हेही वाचा 

Back to top button