नागपूरचे एम्स ठरले देशातील पहिले एनएबीएच मान्यता प्राप्त रूग्णालय | Nagpur News | पुढारी

नागपूरचे एम्स ठरले देशातील पहिले एनएबीएच मान्यता प्राप्त रूग्णालय | Nagpur News

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील नॅशनल अक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) चे मानाकंन प्राप्त करणारे प्रथम रूग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन केले. एनएबीएच मान्यता हे आरोग्यसेवेच्या गुणवत्तेसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानाकंन आहे.
एनएबीएचची मान्यता प्रक्रिया कठोर आणि सर्वसमावेशक असते.  यामध्ये रूग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थात्मक कार्यक्षमतेसह अनेक क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. एम्स नागपूरने एनएबीएचची मान्यता मिळवून आरोग्य क्षेत्रात  एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामुळे या रुग्णालयालाकडे रूग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलेले आणि आरोग्य सेवांचा अग्रगण्य प्रदाता म्हणून त्याची प्रतिष्ठा सुधारण्यास अधिक मदत होईल.
एम्स नागपूरबाबतचे ट्विट सामायिक करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रूग्णालयाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “या कामगिरीबद्दल एम्स नागपूरच्या  चमूचे अभिनंदन, ही कामगिरी  करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे.” प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते या रूग्णालयाचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते हे विशेष.

Back to top button