G7 Summit : जपानमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांची गळाभेट | पुढारी

G7 Summit : जपानमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांची गळाभेट

पुढारी ऑनलाइन डेस्क : G7 Summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या G7 परिषदेसाठी हिरोशिमा येथे आहे. या परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक हे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी आणि ऋषी सूनक यांनी एकमेकांची आनंदाने गळाभेट घेतली. याचे छायाचित्र एएनआयने पोस्ट केले आहे.

G7 परिषदेसाठी पंतप्रधान शुक्रवारी भारतातून रवाना झाले. जपान येथे पोहोचल्यानंतर त्यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये भारत-जपान व्यापार, आर्थिक, सांस्कृतिक संबंधांवर चर्चा झाली. आज पंतप्रधान यांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी महात्मा गांधींचे आदर्श हे जगाला हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे, असे मत व्यक्त केले. तसेच जपानमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जपान सरकारला धन्यवाद दिले.

यावेळी G7 परिषद सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे चँसलर ओलाफ स्कॉल्झ, व्हिएतनामचे समकक्ष फाम मिन्ह चिन्ह यांची भेट घेतली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील हिरोशिमा येथे कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी “भारत-कोरिया प्रजासत्ताक या वर्षी राजनैतिक संबंधांची 50 वर्षे साजरी करत असताना द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नेत्यांनी वचनबद्धतेची पुष्टी केली. व्यापार आणि गुंतवणूक, उच्च तंत्रज्ञान, आयटी हार्डवेअर उत्पादन, संरक्षण, सेमीकंडक्टर आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर नेत्यांनी सहमती दर्शवली. तसेच भारताचे G20 अध्यक्षपद आणि कोरिया रिपब्लिक ऑफ कोरियाच्या इंडो-पॅसिफिक रणनीतीवर चर्चा केली,” असे ट्विट MEA प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले.

मोदी-बायडेन यांची गळाभेट

G7 परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सहभागी झालेत. यावेळी परिषद स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची देखील गळाभेट घेतली. याचा व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला आहे.

 

Back to top button