आजचे राशिभविष्य (१९ मे २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (१९ मे २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : जॉब करणार्‍याना कार्यक्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ चोरी होऊ शकतात.
वृषभ
वृषभ

वृषभ : वाईट काळात पैसा तुमच्या कामी येईल. आजपासूनच आपल्या पैशांची बचत करण्याचा विचार करा, तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मिथुन
मिथुन

मिथुन : विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. खासगी आणि गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका.
कर्क
कर्क

कर्क : प्रवासाच्या संधी शोधाल. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं; पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे.
सिंह
सिंह

सिंह : प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूलतत्त्वे आहेत आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे.
कन्या
कन्या

कन्या : तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल.
तुळ
तुळ

तूळ : तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
धनु

धनु : कार्य क्षेत्रात चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल.
राशिभविष्य
मकर

मकर : तुमच्या फायद्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेची ताकद वापरा. नवीन संकल्पना देण्याबरोरच व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करण्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल.
कुंभ
कुंभ

कुंभ : कुटुंबासमवेत काही निवांत क्षण घालवा. खर्‍या प्रेमाचा अनुभव येईल. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही, त्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका.
मीन
मीन

मीन : अति चिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील.

Back to top button