उत्तर प्रदेशच्या सर्व १७ महापालिका भाजपकडे | पुढारी

उत्तर प्रदेशच्या सर्व १७ महापालिका भाजपकडे

लखनौ; वृत्तसंस्था :  उत्तर प्रदेशातील सर्व १७ महापालिका भाजपने जिंकल्या असून, सप, बसप आणि काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. गोरखपूर, प्रयागराज, वाराणसी, मेरठ, फिरोजाबाद, बरेली, अलीगड, गाझियाबाद, अयोध्या, शहाजहानपूर, कानपूर, झाशी, लखनौ, आग्रा मुरादाबाद, सहारनपूर, मथुरा-वृंदावन अशा सर्व महापालिका भाजपने जिंकल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

भाजपच्या प्रमिला पांडे कानपूर महापालिकेत दुसऱ्यांदा महापौर झाल्या आहेत. लखनौमध्ये भाजपच्या सुषमा खरकवाल यांनी सपच्या वंदना मिश्रा यांचा पराभव केला. प्रयागराजमध्ये भाजपचे उमेशचंद्र गणेश केसरवानी यांनी सप उमेदवार अजय कुमार श्रीवास्तव यांचा पराभव केला.

Back to top button