मासळीची आवक रोडावल्याने दर तेजीत; इंग्लिश अंड्यांच्या भावातही वाढ | पुढारी

मासळीची आवक रोडावल्याने दर तेजीत; इंग्लिश अंड्यांच्या भावातही वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मासेमारीसाठी गेलेल्या बोटी किनार्‍यावर परतू लागल्या आहेत. याखेरीज, देशाच्या पूर्व किनारपट्टी क्षेत्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी, बाजारात मासळीची आवक रोडावली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाला मागणी चांगली असल्याने गत आठवड्यातील मासळीचे तेजीतील दर कायम आहेत. तर, इंग्लिश अंडीच्या भावात शेकड्यामागे दहा रुपयांनी वाढ झाली. किरकोळ बाजारात मात्र अंडीचे भाव स्थिर राहिले.

याखेरीज, चिकन, गावरान अंडी व मटणाचे भावही गत आठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याचे सांगण्यात आले. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 7) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 12 टन, खाडी 200 ते 300 किलो, तर नदीच्या मासळीची 800 ते 1000 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-1800, मध्यम : 1400-1600, लहान : 1200, भिला : 1000, हलवा : 800, सुरमई : 1000-1100, रावस : 900-1000, घोळ : 700-800, करली : 400-480, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 400-440, पाला : 1200-1400, वाम : काळी 360-400 पिवळी 750-850, ओले बोंबील : 200-240. कोळंबी : लहान 200-280, मोठी : 360-600, जंबोप्रॉन्स : 1400-1500, किंगप्रॉन्स : 750-800, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 300-360, मांदेली : 100-140, राणीमासा : 200-300, खेकडे : 240-280, चिंबऱ्या : 480-550. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 400, नगली : 400, तांबोशी : 400-440, पालू : 240-280, लेपा : 240-280, बांगडा : लहान 100 मोठा 120-140, शेवटे : 200-240, पेडवी : 100, बेळुंजी : 140-160, खुबे : 100-120, तिसर्या : 200-240 तारली : 120-140. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-440, शिवडा : 240-280, खवली : 240-280, आम्ळी : 120-160, खेकडे : 400-480, वाम : 550-600. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 220, लेगपीस : 270, जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 320. अंडी : गावरान (शेकडा) 850, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 485, डझन 66, प्रतिनग 5.5.

 

Back to top button