Death of young girl : लग्नात जेवण वाढणाऱ्या तरुणीचा रश्श्यात पडून मृत्यू | पुढारी

Death of young girl : लग्नात जेवण वाढणाऱ्या तरुणीचा रश्श्यात पडून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात एका तरुणीचा उकळत्या रश्श्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरम रश्शाच्या भांड्यात पडून २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्‍याचा मृत्‍यू झाला.

पीडित मुलगी एका केटरिंग फर्ममध्ये अर्धवेळ काम करत होती. पोलिसांनी सोमवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ती एका लग्न समारंभात उपस्थित पाहुण्यांना जेवण देत असताना उकळत्या रश्शाच्या कढईत पडली. कढईत पडल्याने या तरुणीला गंभीररित्या भाजले. त्यामुळे तिला शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ३० एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला.

लग्नसमारंभात पाहुण्यांना जेवण देणारी ही तरुणी कढईत पडल्यानंतर या सोहळ्यात गोंधळ उडाला. तिच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली गेली. महाविद्यावलयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

Back to top button