रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही : खा. विनायक राऊत | पुढारी

रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही : खा. विनायक राऊत

राजापूर; पुढारी वृत्तसेवा :  बारसू प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे. या प्रकल्पाला आमचा पूर्ण विरोध आहे. सरकार तो जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, शासनाचा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. येथील जनतेला नको असलेला प्रकल्प हा आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी रानतळे (राजापूर) येथे सरकारलाला दिला.

सोमवारपासून रिफायनरी विरोधक बारसू येथील सड्यावर ठाण मांडून बसले आहेत. मंगळवारपासून माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 26 एप्रिल) राऊत यांनी बारसू सड्यावर आंदोलन करणार्‍या आंदोलकांची भेट घेतली व उद्धव ठाकरे यांची शिवसेना तुमच्या समवेत आहे, असे त्यांना आश्वस्त केले. त्यानंतर उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह पोलिसांवर टीका केली.

Back to top button