Twitter Alternative Bluesky : ट्विटरला पर्यायी ॲप ‘ब्लूस्की’ लाँच, जॅक डोर्सीचे एलॉन मस्कला थेट आव्हान | पुढारी

Twitter Alternative Bluesky : ट्विटरला पर्यायी ॲप ‘ब्लूस्की’ लाँच, जॅक डोर्सीचे एलॉन मस्कला थेट आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : Twitter Alternative Bluesky : ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी (jack dorsey) यांनी नवीन सोशल प्लॅटफॉर्मअॅप्लिकेशन लाँच केले आहे. ‘ब्लूस्की’ (Bluesky App) असे या नवीन अॅप्लिकेशन नाव असून ते एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ‘ट्विटर’ला पर्याय म्हणून काम करेल, अशी चर्चा रंगली आहे.

जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. जॅक डोर्सी यानींच ट्विटरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये एका उंचीवर नेले होते. आता ब्ल्यू स्काय लॉन्च करून ते ट्विटरला कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी त्यासाठी पेड सर्व्हिस सुरु केली. आता वापरकर्त्यांना ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागत आहेत. ट्विटर फक्त ब्ल्यू टिक साठीच नव्हे तर अनेक सर्व्हिससाठी शुल्क आकारते. त्यातच ट्विटरने जगातील अनेक मोठ-मोठ्या लोकांच्या खात्यांवरून ब्लू टिक काढून टाकायला सुरुवात केली आहे. अशात जॅक डोर्सी यांनी लॉन्च केलेले ब्लूस्की हे अ‍ॅप वापरकर्त्यांना मोफत वापरता येणार आहे. यामुळे ते लवकरच ट्विटरपेक्षा जास्त प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे

डोर्सी यांनी 2019 मध्येच ट्विटरच्या पैशातून साइड प्रोजेक्ट म्हणून ‘ब्लूस्की’ची निर्मिती करण्यास सुरुवात केली. यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटी, ब्लूस्की अॅप प्रथमच IOS वापरकर्त्यांसाठी आणले गेले. आता ते अँड्रॉईड वापरकर्त्यांनाही खुले झाले आहे.

जॅक डोर्सीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सोशल मीडियाशी जोडलेल्या इंटरनेट वापरकर्त्यांना अधिक पर्याय मिळतील. क्रिएटर्सना हा प्लॅटफॉर्म वापरताना स्वातंत्र्य मिळेल. तथापि, ब्ल्यूस्की अॅप अद्याप विकासाच्या टप्प्यात आहे. कंपनी त्यावर वेगाने काम करत आहे. आम्ही एटी प्रोटोकॉल तयार करत आहोत.

मोठ्या पोस्ट करता येणार

ब्लूस्कीला एक अतिशय सोपा इंटरफेस देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामध्ये 256 कॅरेक्टरच्या पोस्टसाठी बटणाचा पर्यायही देण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये फोटो देखील जोडू शकता. BlueSky वापरकर्ते त्यांची खाती शेअर, म्यूट आणि ब्लॉक करू शकतात. अॅपच्या नेव्हिगेशनसाठी, तळाशी एक शोध पर्याय देखील दिला जाणार आहे.

सध्या BlueSky अॅपचे 20,000 सक्रिय वापरकर्ते

टेकक्रंचच्या मते, लाँचच्या वेळी ब्लूस्की अॅपमध्ये लाईक्स, बुकमार्क मॉनिटरिंग, ट्विट्स सुधारणे, रिट्विट्स, अप्रत्यक्ष संदेश आणि हॅशटॅग यासारखी मूलभूत वैशिष्ट्ये नाहीत. पण येणा-या काळात हे अॅप Twitter पेक्षा अधिक सुविधा देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. BlueSky अॅप लाँच झाल्यानंतर त्याच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ होत आहे. सध्या त्याचे 20 हजारहून अधिक सक्रिय वापरकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

Back to top button