Hardik Pandya Fined: हार्दिक पंड्याने केला आचारसंहितेचा भंग, आयपीएलने ठोठावला 12 लाखांचा दंड | पुढारी

Hardik Pandya Fined: हार्दिक पंड्याने केला आचारसंहितेचा भंग, आयपीएलने ठोठावला 12 लाखांचा दंड

[web_stories title=”false” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”See More Web Stories” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”10″ order=”ASC” orderby=”post_date” view=”circles” /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya Fined : पंजाब किंग्स विरुद्धचा सामना सहज जिंकूनही गुजरात टायटन्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलमध्ये गुरुवारी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना झाला. यात गुजरात टायटन्सने 6 गडी राखून बाजी मारली. या विजयानंतर गुजरातचे खेळाडू व पाठीराखे आनंद साजरा करत असतानाच कर्णधार पंड्याला 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याची बातमी धडकली. यामुळे गुजरात संघाला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. (Hardik Pandya Fined)

पंजाब आणि गुजरात यांच्यातील हा सामना मोहालीमध्ये खेळला गेला. या सामन्यात पीबीकेएसने प्रथम फलंदाजी करताना 153 धावा केल्या. 19.5 षटकांमध्ये गुजरातने हे लक्ष्य पार करून विजयाची नोंद केली. गुजरातचा फिनिशर राहुल तेवतियाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. मात्र, षटकांची गती कमी राखल्याने गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. गुजरातची पुढील लढत रविवारी राजस्थान रॉयल्सशी होईल, तर पंजाबची लढत शनिवारी लखनऊशी होईल. (Hardik Pandya Fined)

गुजरातचा हा यंदाच्या हंगामातील तिसरा विजय, तर पंजाब किंग्जचा हा दुसरा पराभव आहे. गुजरात टायटन्स संघ या विजयानंतर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर पंजाबचा संघ 4 सामन्यात 2 विजय आणि 2 पराभवानंतर सहाव्या स्थानावर आहे.

Back to top button