Prithvi Shaw vs Sapna Gill : क्रिकेटर पृथ्वीला हायकोर्टाचा दणका, सपना गिल प्रकरणी मोठा निर्णय | पुढारी

Prithvi Shaw vs Sapna Gill : क्रिकेटर पृथ्वीला हायकोर्टाचा दणका, सपना गिल प्रकरणी मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : Prithvi Shaw vs Sapna Gill : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये अपयशी ठरत आहे. त्यातच आता मैदानाबाहेरही त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मीडिया इन्फ्लयुएन्सर सपना गिलविरोधात मुंबईच्या रस्त्यावर झालेल्या वादातून हायकोर्टाने पृथ्वी शॉ याला नोटीस पाठवली आहे.

फेब्रुवारीमध्ये पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर सपना गिल यांच्यात सेल्फी घेण्यावरून वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. त्यानंतर पृथ्वी शॉ याने सपना गिलविरोधात मारहाण आणि पैसे मागितल्याचा आरोप करत पोलिसांत एफआयाअर दाखल केली. (Prithvi Shaw vs Sapna Gill)

यानंतर पोलिसांनी सपना आणि तिच्या एका मित्राविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. मात्र त्यानंतर सपना गिलने तिच्यावरील एफआयआरविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. ज्यामध्ये तिने पृथ्वी शॉवर बॅटने मारहाण आणि छेडछाड केल्याचा आरोप केला होता. याच याचिकेच्या आधारे मुंबई हायकोर्टाच्या वतीने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यात काही पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कर्तव्य चोख बजावत नसल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. (Prithvi Shaw vs Sapna Gill)

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई