पिंपरी: जुन्या वादातून टोळक्याकडून बेदम मारहाण | पुढारी

पिंपरी: जुन्या वादातून टोळक्याकडून बेदम मारहाण

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री सुसगाव येथे घडली. अर्जून रावसाहेब पवार (18, रा. सुसगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आदेश टेमकर, आदेश खलसे (दोघे रा. सुसगाव), व्यंक्या, पिल्या, आकाश कांबळे व गणेश चौधरी (दोघे रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुसगाव येथे यात्रेसाठी पायी जात होते. त्या वेळी फिर्यादी यांच्या ओळखीचे आरोपी हातात कोयता व दगड घेऊन तेथे आले. आरोपींनी फिर्यादी यांच्याशी भांडण करीत परिसरात दहशत पसरवली. ‘तुला होळी दिवशी समजावून सांगितले होते, पण तुझ्यात सुधारणा नाही,’ असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. फिर्यादीने तेथून पळ काढला असता आरोपींनी पाठलाग करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button