CBSE : सीबीएसई मंडळाला केंद्राकडून आयकरात सवलत | पुढारी

CBSE : सीबीएसई मंडळाला केंद्राकडून आयकरात सवलत

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 11 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाला पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी आयकरात सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सीबीएसई बोर्डाची पुस्तके स्वस्त होतील तसेच परीक्षा शुल्कही कमी होण्यास मदत होणार आहे.
परीक्षा शुल्क, पुस्तकांच्या विक्रीबरोबरच इतर माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नातून सीबीएसईला सवलत दिली जात असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आयकर खात्याच्या कलम 10 (46) नुसार ही सवलत देण्यात आली आहे. याआधीही काही वर्षे अशा प्रकारची सवलत देण्यात आली होती. सीबीएसईच्या कोणत्याही व्यावसायिक उपक्रमासाठी मात्र ही सवलत लागू राहणार नाही, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा :

Back to top button