क्रूझ ड्रग्ज पार्टी – सोडलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस : फडणवीस | पुढारी

क्रूझ ड्रग्ज पार्टी - सोडलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस : फडणवीस

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गाजत असलेल्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याशी संबंधित मुलाला सोडले आहे असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. क्रूज वरील ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझवरील कारवाईत काही जणांना सोडल्याचा आरोप केला होता.

यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. ‘क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी ज्यांना एनसीबीने सोडलं त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या एक जवळचा माणूस होता. त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की तो क्लीन होता. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे.’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा : ड्रग्ज प्रकरण: शाहरूख खानच्या ड्रायव्हरला एनसीबीचे समन्स

क्रूझ ड्रग्ज पार्टी : क्लीन असल्याने नाव घेऊन बदनाम करणे अयोग्य

एनसीबीने अगोदरच सांगितले होते की त्यांनी अनेक लोकांना पकडले होते, त्याच्यातील जे क्लीन होते, त्यांना त्यांनी सोडलं आहे. ज्यांच्याकडे काही सापडलं, ज्यांच्या फोनमध्ये काही पुरावे सापडले, संभाषण सापडले त्यांनाच फक्त ताब्यात घेतलं.

ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. याचे राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडलं त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस होता. त्याचं नाव आम्ही घेत नाही. कारण की तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. एनसीबीने स्पष्ट केलंय की क्लीन होते त्यांना सोडलं आणि ते कोणत्या पक्षाचे होते हा विषय येत नाही असे फडणवीस म्हणाले.

Back to top button