पुणे : कांदा पिकावर ड्रोनद्वारे मोफत फवारणी | पुढारी

पुणे : कांदा पिकावर ड्रोनद्वारे मोफत फवारणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने कांदा व लसूण संशोधन केंद्राला दोन अद्ययावत ड्रोन दिले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून कांदा पिकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक व किती एकराला किती औषधे, किती अंतरावरून फवारणी केली तर चालेल, याचे प्रमाण ठरविण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येणार्‍या खरीप हंगामापासून खेड उपविभागातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतील कांदा
उत्पादक शेतकर्‍यांना ड्रोनद्वारे मोफत फवारणी करून देण्यात येणार असल्याची माहिती कांदा व लसूण संशोधन केंद्राचे वरिष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. राजीव बळीराम काळे यांनी दिली.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कांदा व लसूण संशोधन केंद्राला ड्रोन देण्यात आले आहेत. कांदा व लसूण संशोधन केंद्राच्या वतीने पुढील एक-दोन महिने ड्रोनद्वारे कांदा पिकांसाठी आवश्यक असलेले सर्व प्रमाण ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर खरीप हंगामापासून चार तालुक्यांसह अन्य भागांत देखील तब्बल 500 हेक्टरपर्यंत शेतकर्‍यांना कांदा पिकांसाठी हे ड्रोन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले. म

Back to top button