पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो फाडल्याप्रकरणी काँग्रेस आमदाराला ‘इतक्या’ रुपयाचा दंड | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो फाडल्याप्रकरणी काँग्रेस आमदाराला 'इतक्या' रुपयाचा दंड

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र फाडल्याप्रकरणी गुजरातच्या एका आमदाराला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 2017 मधील हे प्रकरण आहे. याप्रकरणी त्यांना नरेंद्र मोदी यांच्या चित्राची फ्रेमची तोडफोड करून मोदी यांचे चित्र फाडल्याप्रकरणी न्यायालयाने 99 रुपयांचा दंड ठोठावला आहे. जाणून घ्या नेमके प्रकरण काय होते.

गुजरातमधील नवसारी येथील न्यायालयाने काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना 2017 च्या एका प्रकरणात 99 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनात घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र तोडल्याचा पटेल यांच्यावर आरोप आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.ए. धाधल यांच्या न्यायालयाने वांसदा (एसटी) सीटचे आमदार पटेल यांना आयपीसी कलम 447 अंतर्गत गुन्हेगारी घुसखोरी केल्याबद्दल दोषी ठरवले. 2017 मध्ये जलालपूर पोलिसात पटेल आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर सहा जणांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने तिन्ही आरोपींना गुन्हेगारी स्वरुपात दोषी ठरवले आणि त्यांना 99 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. असे न केल्यास त्याला सात दिवस साधी कारावास भोगावा लागणार आहे. तथापि, बचाव पक्षाने दावा केला की एफआयआर राजकीय सूडबुद्धीचा परिणाम आहे.

हे ही वाचा :

Disney कडून मोठी नोकरकपात! ७ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

अर्थज्ञान : दोघांच्या नावावर घर? कर आकारणीचे काय?

Back to top button