अर्थज्ञान : दोघांच्या नावावर घर? कर आकारणीचे काय? | पुढारी

अर्थज्ञान : दोघांच्या नावावर घर? कर आकारणीचे काय?

  • अर्थज्ञान; स्वाती देसाई

आपण एखादी मालमत्ता खरेदी केली असेल आणि त्यात पत्नीचे नाव असेल, तर दोघांना होल्डिंगचे विवरण आयटीआरमध्ये द्यावे लागेल. अर्थात, अशी माहिती सादर न केल्यास पती आणि पत्नी या दोघांची मालमत्तेतील भागीदारी ही 50 टक्के गृहीत धरली जाईल. यानुसार दोघांनाही कर भरावा लागेल.

‘दिल्ली ब—ँच ऑफ द इन्कमटॅक्स अपिलेट ट्रिब्यूनल’च्या दिल्ली पीठाच्या मते, मालमत्तेच्या सेल डीडमध्ये पती आणि पत्नीच्या होल्डिंगची मर्यादा निश्चित केलेली नसेल, तर दोघांची मालमत्तेतील भागीदारी समान म्हणून गृहीत धरली जाईल. दिल्ली ब—ँच ऑफ द इन्कमटॅक्स अपिलेट ट्रिब्यूनलने (आयटीएटी) एका प्रकरणावर निकाल देताना वरीलप्रमाणे मत मांडले आहे. वास्तविक, ‘आयटीएटी’ने शिवानी-मदनच्या बाबतीत हा निर्णय सुनावला आहे. आर्थिक वर्ष 2014-15 च्या काळात त्यांच्यावरील 9.8 लाख रुपयांचा कर कायम ठेवला होता. प्रत्यक्षात मालमत्ता रिकामी होती. अशा वेळी प्राप्तिकर कायद्याच्या अधिनियमातील तरतुदीनुसार ‘नोटीओनल रेंट’मध्ये असणारा 50 टक्के पत्नीकडील वाटा हा करपात्र होता.

प्रकरण काय?

2011 मध्ये एका बिझेनस ग्रुपची आणि करदात्याची झाडाझडती घेतली असता, करविभागाला तपासणीत पतीसह जॉईंट ओनरशिपमध्ये 3.5 कोटी रुपयाचे एक घर असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या घरातून मिळणार्‍या उत्पन्नाचा आयटी विवरणात उल्लेख का केला नाही, अशी विचारणा करण्यात आली. विशेष म्हणजे शिवानी-मदनने मालमत्तेत केवळ 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती आणि ती गुंतवणूक मालमत्ता खरेदी मूल्याच्या सुमारे 5.4 टक्के आहे. आयटी नोटिसीला उत्तर देताना मालमत्तेतून होणार्‍या उत्पन्नात आपल्या वाट्याला आलेल्या सोर्सचा उल्लेख केला. हे प्रकरण इन्कम- टॅक्स अपिलेट ट्रिब्यूनलकडे गेले. ‘आयटीएटी’मध्ये पतीने बाजू मांडताना म्हटले की, सेल डीडमध्ये पत्नीचे नाव आहे, त्यामुळे पत्नीचा हिस्सा कमी असूनही त्यावर 50 टक्के कर आकारणे योग्य नाही. यासाठी त्याने अन्य न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ दिला.

आयटीएटीने फेटाळून लावला अर्ज

अर्थात, याप्रकरणी तथ्याचा आधार घेत आयटीएटीने पतीचा दावा फेटाळून लावला. उदा. प्राप्तिकर लवादाने म्हटले की, कोलकता उच्च न्यायालयाने मालमत्तेतून मिळणार्‍या उत्पन्नावर केवळ पतीवर कर आकारणे गरजेचे आहे कारण पत्नी गृहिणी होती. पत्नीला उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते आणि संपूर्ण गुंतवणूक त्यानेच केली होती. पण जेव्हा मदनच्या बाबतीत ती एक नोकरदार हेाती. प्रत्यक्षात ज्या समूहाची झाडाझडती घेतली, त्याच व्यावसायिक समूहात मदन हा काम करत होता. कर तज्ज्ञांच्या मते, मालमत्तेवर पत्नीचे नाव जोडणे ही सामान्य बाब आहे. अर्थात प्रॉपर्टी बिल्डरकडून आणि सेलरनेदेखील केलेल्या व्यवहारात, बँक खाते विवरणात आणि रिटर्नमध्ये पत्नीची माहिती असणे बंधनकारक आहे. या गोष्टी कर आकारणीच्या खटल्यात महत्त्वाच्या ठरतात.

Back to top button