पुणे : 11 लाख 34 हजारांचे अमली पदार्थ जप्त | पुढारी

पुणे : 11 लाख 34 हजारांचे अमली पदार्थ जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या नायजेरियन आणि येमन देशातील दोघांना अमली पदार्थविरोधी पथक 1 ने कोंढव्यातून अटक केली. दोन कारवाईत पथकाने साडेपाच लाखांचे कोकेन आणि 4 लाख 63 हजारांचे कॅथा इडुलिस अमली पदार्थ जप्त केले. त्याशिवाय मोबाऊल, दोन लाखांची रोकड आणि इतर ऐवज मिळून 11 लाख 35 हजारांवर ऐवज जप्त केला. उंड्री परिसरात नायजेरियन कोकेन विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार पांडुरंग पवार यांना मिळाली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय लक्ष्मण डेंगळे, एपीआय शैलेजा जानकर यांच्या पथकाने फेलिस्क ऐजे एकेचुकु (वय 52, रा. उंड्री) याच्याकडून 4 लाख 63 हजारांचे 23 ग्रॅम कोकेन, मोबाईल, दुचाकी असा साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला. दुसर्‍या कारवाईत पोलिस नाईक विशाल शिंदे यांच्या माहितीनुसार, येमन तस्कर अल-सयाघी अब्दुलेलाहा अब्दुल्ला अहमद (वय 29) याच्याकडून 5 लाख 87 हजारांचा कॅथा इडुलिस खत अमली पदार्थ, दोन लाखांची रोकड, मोबाईल असा 8 लाख 74 हजारांचा ऐवज जप्त केला.

Back to top button