पैठण: संत एकनाथ साखर कारखान्याची २८ लाखांची फसवणूक : ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

पैठण: संत एकनाथ साखर कारखान्याची २८ लाखांची फसवणूक : ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ऊस हंगामासाठी मजूर व वाहतूकदार पुरवठा करणाऱ्या मुकादमांनी २८ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी संत एकनाथ प्रायव्हेट शुगर लिमिटेड कंपनीचे संचालक सचिन घायळ यांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आज (दि.२२) दुपारी सहा जणांविरुद्ध २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी या कंपनीने कर्मचारी व शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने २० सप्टेंबर २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान गळीत हंगामासाठी मजूर वाहतूक व्यवस्था पुरवठा करणारे मुकादमासोबत करार केला होता. परंतु ऊस हंगाम काळात कारखान्याला सूचना न देता मुकादम मजूर व वाहने घेऊन गेला होता.

मुकादम शिवाजी सुभाष सोनसळे (रा.भनकवाडी ता.शिरूर कासार जि. बीड), एकनाथ भुजंग गिहे (रा.उकरडा चकला, ता शिरूर कासार, जि. बीड) व जामीनदार नारायण मुरलीधर बढे (रा.वारणी, ता शिरूर कासार) यांनी १९ लाख रुपयांची तर एकनाथ रेखु राठोड (रा.लक्ष्मीआई तांडा, नाळवंडी, जि बीड), यादव गिण्यानदेव चव्हाण (रा. नालवंडी, जि. बीड), संतोष बारकूराव यादव (रा. पहाडी पारगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांनी संगणमत करून कारखान्याची १६ लाख अशी एकूण २८ लाखांची फसवणूक केली.

या प्रकरणी कंपनीचे संचालक सचिन विक्रम घायाळ यांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भागवत नागरगोजे यांनी तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा 

Back to top button