जळगाव: ट्रक थांबवून लूटमार करणारी टोळी जेरबंद; ५ जणांना अटक | पुढारी

जळगाव: ट्रक थांबवून लूटमार करणारी टोळी जेरबंद; ५ जणांना अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : ट्रक थांबवून लूटमार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ५ दरोडेखोरांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि. २२) जेरबंद केले. जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातून त्यांना अटक करून चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नवाबख खान गुलाब खान (वय ३२, रा. शिवाजीनगर, जळगाव), शाहरुख खान शाबीर खान (वय ३०, रा. गेंदलाल मिल जळगाव), सौरभ भुवनेश्वर लांजेवार (वय ३५, रा. रायपूर, जळगाव), जावेद खान नसीर खान (वय ३२, रा. गेंदालाल मिल) आणि प्रदीप राधेश्याम रायपुरिया (वय ३४, रा. गेंदालाल मील, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यात ट्रक थांबवून लूटमार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, अकरम शेख, महेश महाजन, परेश महाजन, रवींद्र पाटील, अविनाश देवरे, दीपक शिंदे तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे, शेषराव थोरे, प्रमोद पाटील, संतोष पारधी, प्रमोद पवार यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा 

Back to top button