ईशा देओल – लव्ह यू मम्मा…! | पुढारी

ईशा देओल - लव्ह यू मम्मा...!

ड्रीमगर्ल हेमा मालिनी या नेहमीच चर्चेत असतात. सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना भुरळ घालणार्‍या हेमा यांची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. अभिनयाप्रमाणेच नृत्यातून त्या प्रेक्षकांना भारावून टाकतात. नुकताच त्यांनी बॅले डान्स केला आहे. मुंबईतील एका शानदार कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मोहित केले. त्यांनी गंगा नदीवर आधारित एक बॅले डान्स केला. पांढर्‍या आणि निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करून त्यांनी हवेत तरंगत एरियल प्रकारे हा बॅले डान्स सादर केला. त्यांचे हे नृत्य पाहून त्यांची कन्या ईशा देओल हिने त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. ईशाने या नृत्य सादरीकरणाचा त्यांचा एक फोटो पोस्ट करत, माझ्या आईचा गंगेवर आधारित डान्स मी पाहिला. हे सादरीकरण अत्यंत सुरेख आणि नेत्रदीपक होते. यातून पर्यावरण संरक्षण आणि नद्यांच्या जीर्णोद्धाराबाबत एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. तुम्ही याचा पुढील शो नक्की पाहा. लव्ह यू मम्मा! वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी केलेला हा बॅले डान्स पाहून सर्वच प्रेक्षक भारावून गेले. या दरम्यानचे अनेक फोटो पोस्ट करत नेटकरी हेमा मालिनी यांचा हा डान्स खूप आवडला असल्याचे सांगत त्यांचं कौतुक करत आहेत.

Back to top button