मंगळावर ‘इंजिन्युटी’ हेलिकॉप्टरचा ‘खेळ’! | पुढारी

मंगळावर ‘इंजिन्युटी’ हेलिकॉप्टरचा ‘खेळ’!

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाची अनेक रहस्ये उलगडण्यासाठी ‘नासा’ने या ग्रहावर ‘इंज्युनिटी’ हे रोव्हरक्राफ्टही पाठवलेले आहे. या चिमुकल्या हेलिकॉप्टरने तिथे अनेक वेळा उड्डाण केले आहे. आता त्याचा असा ‘खेळ’ पर्सिव्हरन्स या रोव्हरने आपल्या कॅमेर्‍यात टिपला आहे. त्याच्या व्हिडीओत दिसते की हे हेलिकॉप्टर मंगळाच्या पठारी भागात इकडे-तिकडे उडत आहे.

हे ‘इंजिन्युटी’चे 47 वे उड्डाण होते जे 9 मार्चला झाले. मंगळाच्या पृष्ठभागाच्या निरीक्षणासाठी हे उड्डाण झाले. त्याने केलेल्या या तपासणीनंतर आता ‘पर्सिव्हरन्स’ त्या दिशेने कूच करील. या उड्डाणावेळी ‘इंजिन्युटी’ने सुमारे 440 मीटरपर्यंत उड्डाण केले. त्यावेळी त्याचा कमाल वेग 5.3 मीटर प्रतिसेकंद इतका होता. जर हे रोव्हरक्राफ्ट सुस्थितीत राहिले तर लवकरच ते आपले 50 वे उड्डाणही करील.

मंगळावर पर्सिव्हरन्स आणि इंजिन्युटीला एकत्रच पाठवण्यात आले होते व ही दोन साधने एकमेकांच्या साथीनेच काम करतात. त्यांच्याकडून ‘नासा’ला मंगळाची अनेक छायाचित्रे व व्हिडीओ मिळालेली आहेत. ही दोन साधने मंगळाभोवती फिरत असलेले ऑर्बिटर किंवा सॅटेलाईट तसेच ‘नासा’च्या डीप स्पेसचा वापर करतात. पृथ्वीवर अनेक शक्तिशाली अँटेना लावलेले असून ते या मोहिमेवर लक्ष ठेवतात. मंगळावर गोळा केलेले नमुने 2033 च्या सुमारास पृथ्वीवर आणण्याची योजना आहे.

Back to top button