नगर : राजूर पोलिस ठाणे महिलांच्या हाती ! महिला पोलिसांचा सन्मान | पुढारी

नगर : राजूर पोलिस ठाणे महिलांच्या हाती ! महिला पोलिसांचा सन्मान

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  जागतिक महिला दिनी राजूर पोलिस ठाण्याचा कारभार महिला पोलिसांच्या हाती देत स.पो.नि. गणेश इंगळे यांनी महिला दिनी महिला पोलिस कर्मचार्‍यांचा सन्मान केला. अकोले तालुक्यातील आदिवासी विभागाचे केंदबिंदू असलेल्या राजूर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिनी ठाणे अंमलदार असलेल्या महिला पो. हेड कॉ. सुवर्णा बी. शिंदे, सविता वायकर, संगिता चोंखडे,पो. कॉ. एस. ए .लोखंडे, होमगार्ड श्रीमती कसाब आदी महिला पोलिस कर्मचार्‍यांचा फेटा बांधून शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राजूर पोलिस स्टेशनचे स. पो. नि. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनी राजूर पोलिस ठाण्याचा कारभार महिला पो. हेड कॉ. सुवर्णा शिंदे यांना ठाणे अंमलदार म्हणून पोलिस ठाण्याचा कारभार एक दिवसासाठी सोपविण्यात आला. तसेच वायरलेस ड्युटी कामी पो. नायक वायकर, सी. सी. टी. एन .एस ड्युटी कामी म.पो कॉ. चव्हाण, बारनिशी टपाल आवक- जावक ड्युटी कामी पो. कॉ. संगिता चोखंडे यांनी कर्तव्य बजावले आहे. तसेच राजूर पोलिस ठाणे हद्दीतील कॉलेज, शाळेला महिला अंमलदार सुवर्णा शिंदे यांनी भेट देऊन विद्यार्थिनींना कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शेख पो. कॉ .अशोक गाढे, विजय फटांगरे पो. कॉ. वर्पे, पो. कॉ. ढाकणे आदी उपस्थित होते.

Back to top button