नागपूर : गोरेवाड्यात मादी बिबटाचा मृत्यू | पुढारी

नागपूर : गोरेवाड्यात मादी बिबटाचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील एक मादी बिबट सायंकाळच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आली. जंगलातील दुसऱ्या बिबट्यासोबत झालेल्या भांडणात मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, गेल्या आठवड्यात प्राणिसंग्रहालयातील एक मादी बिबट (चांदणी) सफारी पिंजर्‍यामधून रात्र निवार्‍यात न परतल्याने गेले ३ दिवस या मादीचा शोध घेण्याचे काम चालू होते. रविवारी संध्याकाळी बिबट पकडण्याचा पिंजरा लावण्यात आला. सोमवारी पहाटे या पिंजर्‍यात एक नर बिबट पकडला गेला. हा नर बिबट गोरेवाडा जंगलातून या सफारी पिंजर्‍यात शिरल्याचे लक्षात आल्याने सोमवारी (दि. ६) पुन्हा चांदणीला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली. दिवसभराच्या शोधमोहीमेनंतर ती मृत अवस्थेत आढळली. उशीरा या मादीचे शव-विच्छेदन होऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पकडलेल्या वन्य बिबट्याला सायंकाळी उशीरा निसर्गमुक्त करण्यात आले.

Back to top button