रत्नागिरी : शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला; उद्या ठिकठिकाणी होम पेटणार | पुढारी

रत्नागिरी : शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला; उद्या ठिकठिकाणी होम पेटणार

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यात होळीच्या सणातील शेवटचा दहावा होम मंगळवारी पेटवला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 315 सार्वजनिक आणि 2 हजार 854 खासगी होळ्यांचा शेवट हा होम पेटवून केला जाणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव हा मोठा सण म्हणून साजरा केला जातो. परजिल्ह्यांतून चाकरमानी या सणासाठी आवर्जून आपापल्या गावाकडे येतात. दि. 24 फेब्रुवारीपासून होळीचा फाक पंचमीला प्रारंभ झाला. शिमगोत्सवात ग्रामदेवता पालख्यांमधून घरोघरी येत असतात. या देवतांच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आतुरलेला असतो. जिल्ह्यात 1 हजार 399 सजलेल्या पालख्यांमधून देव दर्शन देतात.

मंगळवारी शेवटची होळी पेटल्यानंतर ग्रामदेवतांच्या पालख्या या सहाणेवर विराजमान होतात. या ठिकाणी या देवतांचा मांड भरवला जातो. त्याचबरोबर येथे विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातील काही ग्रामदेवतांच्या पालख्या रंगपंचमीच्या दिवशी, काही पालख्या गुढी पाडव्यानंतर मंदिरांमध्ये जातात. या संपूर्ण शिमगोत्सवाच्या काळात खेळे, नमनातील सोंगे हा एक आकर्षक कलाप्रकार पाहावयास मिळतो.

Back to top button