यवतमाळ : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचे चक्काजाम आंदोलन | पुढारी

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचे चक्काजाम आंदोलन

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये दर देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी राळेगाव तालुक्यातील वडकी राष्ट्रीय महामार्गावरील देवधरी- दहेगाव फाट्यावर मनसेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. प्रचंड नुकसान होऊनही पीक विमा मिळाला नाही. विम्याचा लाभ देण्यात यावा, सरकारने जाहीर केलेली प्रोत्साहनपर रक्कम वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात मनसे तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, तालुका उपाध्यक्ष सूरज लेनगुरे, तालुका संघटक नरेंद्र खापणे, संदीप गुरनुले, युवराज चटकी, संदीप कुटे, गणेश भोयर, गजानन बुटे, दीपक वरटकर, श्रीकांत मोहितकर, उमेश पेंदोर, प्रकाश घोटेकर, श्रीकांत मोहितकर, अविनाश डावले, आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार दिलीप बदकी, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, मंडळ अधिकारी महादेव सानप यांच्यासह वडकीचे ठाणेदार विजय महाले आदी यावेळी उपस्थित होते.

Back to top button