नगर : महाजनगल्लीत रस्ताकाम सुरू : महापौर रोहिणी शेंडगे | पुढारी

नगर : महाजनगल्लीत रस्ताकाम सुरू : महापौर रोहिणी शेंडगे

नगर : शहरातील मुख्य रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. आता अन्य रस्त्यांची कामे सुरू झाली असून, तेही लवकरच पूर्ण होतील. ड्रेनेज, पिण्याचे पाणी पाईपलाईन, स्ट्रीट लाईट व रस्ते ही कामे पूर्णत्वास येत असून, शहराच्या विकासाला चालना मिळत आहे.
दूरदृष्टी ठेवून विकासकामे सुरू आहेत, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले. महाजनगल्ली ते तख्ती दरवाजा डांबरीकरणाच्या कामास महापौर शेंडगे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक दत्ता कावरे, गणेश कवडे, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा उपस्थित होते. प्रास्ताविक शशिकांत देशमुख यांनी केले. नरेंद्र गुजराथी यांनी आभार मानले.

 

Back to top button